महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP Plate) लावणे अनिवार्य केले आहे. यासाठी प्रोसेस सुरु आहे. आतापर्यंत लाखो वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. अजूनही अनेक वाहनांना नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी मुदतीपूर्वी बसवून घ्यावी. अन्यथा तुम्हाला दंड बसेल.
HSRP Number Plate
HSRP Plate: HSRP च्या बनावट नंबर प्लेटमुळे वाहनधारकांची फसवणूक; कशी ओळखाल खरी HSRP नंबर Plate
२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP Plate बसवणे अनिवार्य
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अनेकांनी HSRP प्लेट बसवली आहे. परंतु १० टक्के लोकांनी ही प्लेट बसवले नसल्याचे समोर आली आहे. दरम्यान, राज्यात ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे. त्यापूर्वी तुम्ही हे काम पूर्ण करा. २०१९ च्या आधी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावायची आहे.
HSRP Number Plate
Car Number Plate Colour: वाहनांच्या हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या नंबर प्लेटचा अर्थ काय?
HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस (HSRP Number Plate Online Registration Process)
सर्वप्रथम तुम्हाला https://hsrpmhzone2.in/ या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि वाहनाचा प्रकार म्हणजे (टू व्हिलर की फोर व्हिलर) हे निवडायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीची सर्व माहिती भरायची आहे. यात आरसी नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर ही माहिती असणार आहे. ही माहिती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये दिलेली असणार आहे.
यानंतर नंबर प्लेटची डिलिव्हरी तुम्हाला कुठे हवी आहे त्याचा पत्ता भरा त्यानंतर वेळ आणि तारीख निवडा.
यानंतर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
यानंतर तुम्हाला हाय सिक्युरीटी नंबर प्लेटची रिसिप्ट मिळेल. त्याचे पीडीएफ किंवा प्रिंट काढून ठेवा. हे जेव्हा नंबर प्लेट लावली जाईल तेव्हा दाखवावे लागेल.