महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दोन दिवसांपूर्वी वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत २ कोटी ४७ लाख महिलांना या योजनेअंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही अडीच कोटींपेक्षा जास्त आहे. अजूनही अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे ५ लाख महिलांना पैसे मिळाले नाहीत. यामागचे कारण आता समोर आलेले नाही.
केवायसी नाही लाडकीची हप्ता नाही (These Women Will Not Get May Month Installment)
लाडकी बहीण योजनेत फक्त नियमांमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल ५ लाख महिलांनी केवायसी केलेले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. यामध्ये बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
अजूनही अनेक महिलांना मेचा हप्ता मिळालेला नाही
५ लाख महिलांना केवायसी केले नाही म्हणून योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतु याचसोबत अनेक महिला आहेत ज्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांचेही अर्ज रद्द करण्यात आले आहेत.यामध्ये अडीच हजार महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. तर अनेक महिलांना इतर योजनांचाही लाभ घेतला आहे.