पिंपरी चिंचवड : चमत्कार, झाडातून निघाला पाण्याचा झरा ? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जून ।। झाडातून चक्क पाणी वाहतंय…त्यामुळे लोकांनी हा चमत्कार झाल्याचं म्हणत झाडाची पूजा केलीय…झाडाला हार, हळद-कुंकू लावून झाडाचं पाणी प्राशन केलंय…हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत असून, दैवी चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आलाय…

झाडातून पाणी बाहेर आल्याने अनेकांनी गर्दी केली…काहीजणांनी तर झाड रडत असल्याची अफवा पसरवली…ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरल्याने अनेकांनी हे झाड पाहण्यासाठी गर्दी केली…हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला .

पण, पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं…आणि तिथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय हे गंभीर आहे…आम्ही याबाबत आणखी माहिती मिळवली… असता याबाबत झाडाची तपासणी करणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली…

पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात…

– सोसायटीची पाईपलाईन झाडाजवळ फुटली होती

– पाईपलाईन फुटल्याने पाणी झाडातून वाहत होतं

– दैवी चमत्कार नसून अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका

अधिकाऱ्यांनी या झाडाची पाहणी केल्यानंतर अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्याचा मात्र भ्रमनिरास झाला…त्यामुळे अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका…आमच्या पडताळणीत हा दैवी चमत्कार असल्याचा दावा असत्य ठरलाय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *