Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
समृद्धी महामार्गावर सुस्साट प्रवास ? पण टोल किती भरावा लागेल? संपूर्ण माहिती एका क्लिकवर - Maharashtra 24

समृद्धी महामार्गावर सुस्साट प्रवास ? पण टोल किती भरावा लागेल? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जून ।। समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. 706 किमीचा हा महामार्ग मुंबई ते नागपूर हे अंतर 8 तासांत पूर्ण करतो. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून या महामार्गावर प्रवास करताना किती टोल द्यावा लागणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. 2032 पर्यंत टोलचे हे दर असणार आहेत.

5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते ठाण्यातील आमनेपर्यंतच्या शेवटच्या टप्प्यांचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार पालघर जिल्ह्यातील वाढवणपर्यंत करणार असल्याचे जाहीर केले. यामुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असंगी त्यांनी सांगितले.

4 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विकासाकडून जारी करण्यात आलेल्या टोल दर दोन टप्प्यात विभागण्यात आले आहेत. सध्या एप्रिल 1 2025 पासून एका टप्प्यातील दर आकारण्यात येत आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील दर एप्रिल 1 2028 पासून आकारण्यात येईल. अंतिम भाडेवाढ एप्रिल 2031 पासून लागू केली जाईल आणि 10 डिसेंबर 2032 पर्यंत वैध असेल. प्रत्येक टप्प्यात सर्व वाहन श्रेणींमध्ये सरासरी 20 टक्के वाढ दिसून येईल, असे एका अहवालात नमूद केले होते.

सुधारित प्रति किलोमीटर टोल दर खालीलप्रमाणे आहेत:
हलकी मोटार वाहने: 2.45 रुपये (2.06 रुपयांवरून वाढ)
हलकी व्यावसायिक वाहने: 3.96 रुपये (3.32 रुपयांवरून वाढ)
दोन-अ‍ॅक्सल जड वाहने: 8.30 रुपये (6.97 रुपयांवरून वाढ)
तीन-अ‍ॅक्सल जड वाहने: 9.05 रुपये (7.60 रुपयांवरून वाढ)
अवजड बांधकाम यंत्रसामग्री: 13.02 रुपये (10.93 रुपयांवरून वाढ)
मोठ्या आकाराची वाहने (7+ एक्सल): 15.84 रुपये (13.30 रुपयांवरून वाढ)

संपूर्ण 701 किमी प्रवासासाठी, नवीन टोल शुल्क असे असेल:
हलक्या मोटार वाहनांसाठी 1,717.45 रुपये (1,444.06 रुपयांवरून वाढ)
हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी 2,775.96 रुपये (2,327.32 रुपयांवरून वाढ)
2-अ‍ॅक्सल जड वाहनांसाठी 5,818.30 रुपये (4,885.97 रुपयांवरून वाढ)
3-अ‍ॅक्सल जड वाहनांसाठी 6,344.05 रुपये (5,327.60 रुपयांवरून वाढ)
अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी 9,127.02 रुपये (7,661.93 रुपयांवरून वाढ)
मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी 11,103.84 रुपये (9,323.30 रुपयांवरून वाढ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *