Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold-Silver Price: सोन्या-चांदीचा भाव गगनाला भिडला ; पहा १० ग्रॅम सोन्याची किंमत - Maharashtra 24

Gold-Silver Price: सोन्या-चांदीचा भाव गगनाला भिडला ; पहा १० ग्रॅम सोन्याची किंमत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जून ।। सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, ९ जून २०२५ रोजी, सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०९ जून २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १०५,८०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०५८ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९६,६८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *