महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जून ।। आज सकाळी मध्य रेल्वे मार्गावर एक भीषण दुर्घटना घडली आहे. दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान, दोन लोकल जवळून गेल्यामुळे लोकलमधील प्रवाली खाली पडले. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. यादरम्यान, दारावर लटकून प्रवास करणारे अंदाजे १२ प्रवासी थेट रूळावर पडले, त्यापैकी ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूळावर पडलेले प्रवासी हे लोकलच्या फुटबोर्डवर उभे होते. विरूद्ध दिशेनं येणारी धावती लोकल जवळून गेली. यादरम्यान, प्रवासी एकमेकांना धडकले. प्रवाशांचा तोल गेला आणि ८ प्रवासी खाली पडले. काही रूळावर पडल्याची माहिती आहे. यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
जखमी रूग्णाने दिलेल्या माहितीनुसार, लोकलमधील प्रवासी दारावर लटकलेले उभे होते. धावती २ लोकल विरूद्ध दिशेनं जवळून गेल्यामुळे दारावर उभे असलेले प्रवासी एकमेकांना धडकले. तोल जाऊन काही प्रवासी रेल्वे रूळावर पडले. यात ६ जणांचा मृत्यू झाला.