Mumbai Train Accident : मुंबईतील गर्दी नवी नाही, रेल्वे मंत्री काय करतात, राज ठाकरेनी थेट विचारला प्रश्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जून ।। आज मुंबईत रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 प्रवाशांचे प्राण गेली आहेत. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने निघालेल्या या लोकलचा अपघात झाला. या अपघाताची अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाली आहे. यावर आता राज ठाकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की, शहरं म्हणून याकडे बघायला कोणी तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हणून जेवढी चर्चा सुरू आहे आणि जेवढ्या बातम्या लावल्या जात आहेत, तेवढ्या आता तुम्ही या अपघाताच्या लावणार का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील गर्दी बघितली की, विचार येतो की, हे इतकी लोक रेल्वेत कशी जातात आणि प्रवास कसा करतात. आग लागली तर बंब देखील शिरणार नाही, अशी स्थिती आहे. कोण कुठून येतात, काय करतात हे पाहायला कोणीही नाहीये. राज्यातील शहरांची अवस्था बिकट झाली आहे. मुंबईतील गर्दी नवी नाही, रेल्वे मंत्री काय करतात, असेही त्यांनी म्हटले.

रेल्वेमंत्र्यांनी परिस्थिती सुधारावी, प्रचारामध्ये सर्वजण व्यस्थ असून शहरांकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही. आपल्या देशात माणसांची किंमत राहिलेली नाहीये. रेल्वे दुर्घटनेनंतर सरकारने तातडीने लक्ष दिले पाहिजे. लोकलला दरवाजे लावले तर लोक गुदमरून मरतील. लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असा एकही दिवस नाही की, रेल्वेमध्ये अपघात होत नाहीत. सकाळी साधारणपणे नऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *