महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जून ।। अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या कॉलेजचे वे अलाइनमेंट 26 जूनला प्रसिद्ध होणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्यावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (11th Admission Process)
राज्यातील जुनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणारे अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली. अलाइनमेंट यादीत नाव प्रसिद्ध होणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 जून ते तीन जुलै या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी पाच जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केलेल्या बारा लाख विद्यार्थ्यांना प्रवेशांचा आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक
अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरीवाटप 12 ते 14 जून
प्रवेश फेरी १चे वाटप करणे 26 जून
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 27 जून ते 3 जुलै
प्रवेश फेरी दोन साठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे पाच जुलै
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन खूप दिवस झाले आहेत. सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट बंद झाली होती. त्यानंतर २-३ दिवस वेबसाइट बंद होती. यानंतर पुन्हा अकरावीच्या प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. यानंतर आता विद्यार्थ्यांच्या कॉलेजचे वे अलाइनमेंट 26 जूनला जाहीर होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अजून लांबणार आहे.