Nitin Gadkari : ‘दोन वर्षात भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील’, नितीन गडकरींनी सांगितला ‘मास्टर प्लॅन’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जून ।। देशात मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा देशभरात सरकारने केलेल्या कामांबद्दल माहिती देताना दिसत आहे. यादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एका मुलाखतीत येत्या दोन वर्षांमध्ये भारतातील रस्ते तुलनेने अमेरिकेच्या बरोबरीचे होतील असे म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गडकरी म्हणाले की, “प्रश्न हा फेसलिफ्टचा नाही, ते आधीच बदलले आहे. तुम्ही आत्ताच न्यूज रील पाहिली, मुख्य चित्रपट तर अजून सुरू व्हायचा आहे. पाईपलाईनमध्ये असलेले प्रकल्प वेगाने फिढे जात आहेत. आणखी दोन वर्षात तुम्ही पाहू शकाल की भारतातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधा अमेरिकेसारख्या होतील.”

मास्टर प्लॅन काय आहे?
भविष्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, २५ ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे, एक ३,००० किमीचा पोर्ट कनेक्टिव्हिटी हायवे आणि धार्मिक पर्यटन सर्किट्सना जोडणाऱ्या १ लाख कोटी रुपये किमतीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे . यावेळी गडकरी यांनी बौद्धीष्ट सर्किट्स आणि चार धाम यांना ऑल-वेदर रस्त्यांनी जोडण्याच्या योजनेबद्दलही भाष्य केले.

“आम्ही दिल्लीत असंख्य रोड तयार करत आहोत, ज्यामुळे दिल्लीहीन देहारादून दोन तास, दिल्ली ते अमृतसर ३.५ ते ४ तास, दिल्ली ते कटारा ६ तास, दिल्ली ते श्रीनगर ८ तासात, दिल्ली ते जयपूर २ तास, चेन्नई ते बंगळुरू २ तासात, बंगळुरू ते म्हैसूर १ तासात, मेरठ ते दि्लली ५० मिनिटात पोहतचा येईल. आम्ही यासारखे आणखी २५ ग्रीन एक्सप्रेस हायवे तयार करत आहेत जसे की उत्तराखंड येथील हेमकुंड रोपवेज…. आम्ही दिल्लीला वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी १.५ लाख कोटी रुपयांचे रस्ते बनवत आहोत,” असे ते म्हणाले.

“आम्ही जम्मू आणि श्रीनगर यामध्ये ३६ बोगदे विकसित करत आहोत, ज्यापैकी २३ पूर्ण झाले आहेत आणि आणखी ४-५ बोगद्यांचे काम सुरू आहे. आम्ही पर्वतमाला योजनेअंतर्गत १५ रोपवे विकसित करत आहोत, याशिवाय ३५ मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क देखील विकसित करत आहोत,” असेही गडकरी म्हणाले.

“आज जर तुम्ही मनालीहून निघालात तर अटल टनलमधून तुम्हाला रोहतांग पासपर्यंत जाण्यासाठी ८ मिनिटे लागतील, ज्यासाठी आधी ३.५ तास लागत होते… आम्ही श्रीनगर आणि जम्मू दरम्यान ३६ बोगदे बांधत आहोत. त्यापैकी २३ पूर्ण झाले आहेत. ४-५ बोगद्यांचे बांधकाम सुरू आहे… दिल्ली ते चेन्नई हे अंतर २४० किमीने कमी झाले आहे. यामुळे आपले काश्मीर ते कन्याकुमारी जाण्याचे बालपणीचे स्वप्न साकार झाले आहे. आम्ही दिल्लीत अनेक हायवे बांधत आहोत…” असेही गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *