तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जून ।। गेल्या 15 वर्षांपासून अडथळय़ांच्या चक्रव्यूहात अडकलेली सोलापूरची विमान सेवा आजपासून सुरू झाली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

सोलापुरातील विमान सेवा 2010 पासून बंद होती. राजकीय दबावातून विमान सेवेसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचे कारण देत ती पाडण्यात आली. याचा फटका भाजपला सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीमध्ये बसला. त्यानंतर मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा पुढे करीत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळ सुशोभीकरणाचे उद्घाटन झाले. त्यानंतर आज विमानसेवेला सुरुवात झाली.

आमदार-खासदाराचे कार्यक्रमातून ‘वॉकआऊट’
विमान सेवा उद्घाटन सोहळा सुरू असताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील अचानक व्यासपीठावरून एकापाठोपाठ निघून गेल्याने भाजपमधील गटबाजीची चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *