महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या हंगामाचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. एकेक करून सगळ्या टीम्स युएईत दाखल होऊ लागल्या आहेत. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणारा आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदाचा आयपीएल हंगाम भारतात आयोजित करणे शक्य नसल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला आयपीएलच्या आयोजनासाठी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशांची नावं चर्चेत होती. मात्र टेलिव्हिजन प्रसारणाच्या दृष्टीने न्यूझीलंड किंवा वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस आयोजित करणं सोयीचं नसल्याने ही नावं मागे पडली.
कोरोनामुळे पुढे गेलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांचा थरार UAE मध्ये असा रंगणार
जाणून घ्या लिलावापूर्वीचे आयपीएल संघसख्खे शेजारी श्रीलंकेचा पर्यायही समोर आला होता. मात्र कोरोनाचा मर्यादित संसर्ग, बायोबबलची व्यवस्था, सगळया टीम्सची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी हॉटेल्स, एकमेकांच्या टप्प्यात असणारी हॉटेल्स, जाण्यायेण्याची व्यवस्था यामुळे युएईला प्राधान्य देण्यात आलं.
19 सप्टेंबरला 13व्या हंगामातील पहिली मॅच खेळवण्यात येईल तर 10 नोव्हेंबरला अंतिम लढत खेळवण्यात येईल.
सार्वत्रिक निवडणुकांमुळे 2009 मध्ये आयपीएलचा अख्खा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. 2014मध्येही सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचा अर्धा हंगाम युएईतच आयोजित करण्यात आला होता.
युएईतली शारजा, अबूधाबी आणि दुबई इथे मॅचेस खेळवल्या जातील. स्पर्धेत आठ संघ असतील. लिलावानंतर प्रत्येक संघाची संरचना बदलली आहे
