महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – चीनमधून आयात करण्यात आलेल्या सदोष पीसीआर कोरोना टेस्ट कीटमुळे स्कीडनमध्ये मोठी खळबळ माजली आहे. स्कीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बुधवारी चीनमधून आयात करण्यात आलेले कोरोना टेस्ट कीट सदोष असल्याचे म्हटले आहे.
या कीटच्या मदतीने चाचण्या करण्यात आलेल्या 3700 जणांवर करोनाचे उपचार सुरू करण्यात आले. मात्र हे लोकं ठणठणीत असल्याने नंतर उघड झाले. कोरोना चाचणी कीटमध्ये असणाऱया दोषांमुळे साधा सर्दी-पडसे आजार झालेल्या रुग्णांच्या कोरोना चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. चीनच्या बीआयजी जेनोमिक्स या कंपनीने हे किट्स बनवून जगभरात निर्यात केले आहेत. त्यामुळे चिनी कोरोना चाचण्या किटच्या वैधतेवर जगातील अन्य देशही साशंकता व्यक्त करीत आहेत.