Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
राज्यात पावसाचा मारा वाढणार ; ‘इथं’ रेड अलर्ट ! उर्वरित भागात हवामानाची काय स्थिती? - Maharashtra 24

राज्यात पावसाचा मारा वाढणार ; ‘इथं’ रेड अलर्ट ! उर्वरित भागात हवामानाची काय स्थिती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जून ।। पावसानं दडी मारताच राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकाएकी तापमानवाढील सुरुवात झाली आणि हा पावसाळी उन्हाळा अनेक अडचणी निर्माण करताना दिसला. शेतकऱ्यांना शेतपिकांची, पेरणीची चिंता वाटू लागली. अखेर मोठ्या विश्रांतीसाठी गेलेला हाच मान्सून राज्यात परतीच्या दिशेनं प्रवास करताना दिसत आहे.

हवामान विभागानं प्राथमिक निरीक्षणाआधारे वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असल्याची माहिती जारी केली आहे. पावसासाठी होत असणाऱ्या या वातावरणनिर्मितीमुळं कमाल तापमानात पुन्हा घट होण्यास सुरुवात ढाली आहे. तर, आता पुन्हा एकदा दक्षिण मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यात पाऊस जोर धरणास असल्याचा इशारा देत या भागांसाठी ऑरेंज तर रत्नागिरीमध्ये पावसाचा वाढणारा जोर पाहता तिथं रेड अलर्ट जारी केला आहे.

राज्याच्या उर्वरित भागांसाठी मात्र हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथंही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, पालघर, सोलापूर, बीड, धाराशिव इथं हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत आज (१३ जून) ढगाळ हवामान असून, हलक्या पावसाची शक्यता आहेत. यादरम्यान तापमान 28 ते 32°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, संभाजीनगर महाराष्ट्रातील या भागांमध्ये 13 ते 16 जून दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मोसमी पावसामुळे तापमानात काही अंशांची घट अपेक्षित असून या वातावरणाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं सांगण्यात आलं आहे.

विदर्भ (नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा)
विदर्भात मात्र उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळं तापमान 40 ते 42°C पर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी.

मराठवाडा (लातूर, बीड, परभणी, नांदेड)
मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून पावसाच्या हलक्या सरींमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *