महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जून ।। अहमदाबादच्या विमान अपघातातून एकमेव बचावलेला व्यक्ती म्हणजे विश्वास कुमार रमेश. इतक्या भीषण अपघातातून वाचणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. विश्वास कुमार रमेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अहमदाबाद विमान दुर्घटना मी डोळ्याने पाहिलीय. मला स्वःतालाच माहीत नव्हते की मी वाचेन की नाही. मी विमानाच्या दुर्घटनेतून कसा वाचलो हे मलाच माहीत नाही.
एक वेळ मला वाटले की, मी आता मरणार आहे. विमानाच्या खिडकीतून थेट बाहेर फेकला गेलो. त्यानंतर माझे डोळे उघडले तर मला वाटले की मी जिवंत आहे. दुर्घटनेनंतर मी विमानातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. टेक ऑफच्या अवघ्या काही सेकंदाला जाणवले होते की, विमान अचानक थांबले आहे. काही सेकंदात विमानातील लाइट ऑन झाली आणि वेगाने विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले. माझ्या बाजुचा विमानाचा भाग भिंतीला लागला नाही. परंतु, विमानाचे गेट तुटले होते. त्यामुळे मला बाहेर पडणे शक्य झाले. माझा उजवा हात थोडा भाजला आहे. त्यानंतर मला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले, असे रमेश यांनी सांगितले.