Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
LocalTrain : तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड! - Maharashtra 24

LocalTrain : तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून ।। प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. त्यानुसार, उपनगरी लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये केंद्रित तिकीट तपासणी मोहीम सोमवारपासून राबविण्यात येणार आहे.

प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने मध्य रेल्वेकडे येत आहेत. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक आता रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या समवेत गर्दीच्या वेळी सर्व प्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात करण्यात येणार आहे. हे पथके प्रत्येक ट्रेनच्या प्रवासात सर्व डब्यांची तपासणी करेल.अनधिकृत प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ दंड आकारण्यात येईल. दंड भरण्यास नकार दिल्यास, अशा प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून तेथील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडे सोपवले जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या सेकंड क्लासमध्ये होणारी गर्दी पाहता अनेक वेळा प्रवाशांकडून प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास केला जातो. सकाळी आणि संध्याकाळी ही गर्दी जास्त असते. त्यामुळे वेळेवर घर आणि ऑफिस गाठण्यासाठी अनेक प्रवासी पहिल्या दर्जाच्या डब्यातून प्रवास करतात. हे रोखण्यासाठी मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

प्रवाशांनी वैध तिकीट अथवा पास घेऊनच प्रवास करावा. तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून सर्वांसाठी प्रवास सुलभ, न्याय आणि सुरक्षित करावा. मध्य रेल्वेकडून ही मोहीम यापूर्वी यशस्वीरित्या राबवलेल्या एसी लोकल हेल्पलाइन तिकीट तपासणी उपक्रमाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर राबवली जात आहे.

मध्य रेल्वे मोहिमेचे उद्दिष्ट
– प्रथम श्रेणी प्रवाशांचे हक्क सुरक्षित ठेवणे
– उपनगरी रेल्वे प्रवासातील भाडे प्रामाणिकतेला चालना देणे
– सातत्यपूर्ण तपासणीद्वारे अनधिकृत प्रवासास आळा घालणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *