केदारनाथहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले, 6 जणांचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून ।। आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यानच्या जंगलात कोसळले, आणि या भीषण अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टर डेहराडूनहून केदारनाथच्या दिशेने (Kedarnath Helicopter Crash) निघाले होते, मात्र काही वेळातच गौरीकुंडमध्ये ते बेपत्ता झाल्याची माहिती उत्तराखंडचे एडीजी लॉ अँड ऑर्डर डॉ. वी. मुरुगेशन यांनी दिली आहे. अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे सांगण्यात येत आहे. दाट धुके आणि कमी दृश्यतेमुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं काय घडलं?
रेस्क्यू पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू आहे. अधिकृत मृतांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर यात्रेच्या हंगामात भाविकांना केदारनाथपर्यंत पोहोचवण्याची सेवा देत होते. या अपघातामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर अवघ्या तीन दिवसांत झालेली ही दुसरी हवाई दुर्घटना असल्याने हवाई सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होते. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाम गाठत असतात. दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होत असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृत मृतांची संख्या आणि इतर तपशील लवकरच प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे. उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5:17 वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे 7 भाविकांना घेऊन निघाले. वाटेत खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी कठीण लँडिंगला गेले त्यामुळे दुर्घटना झाली आहे.

मृतांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशनचे होते. गौरीकुंडमध्ये हा अपघात झाला आहे, केदारनाथ धामहून फाटा येथे येणारे हेलिकॉप्टर कोसळले आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील गौरीकुंड परिसरात एक मोठा अपघात झाला आहे. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते. या दुर्दैवी अपघातात सर्व जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी कोसळले. गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला. ही घटना पहाटे 5.30 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जण असल्याची माहिती आहे.

या महिन्यातील चौथी घटना
8 मे: उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू
उत्तरकाशीतील गंगणी येथे भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. अपघातात पायलटसह ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बरेली येथील आई-मुलीचाही समावेश आहे. हेलिकॉप्टर गंगोत्री धामला जात होते. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 7 आसनी हेलिकॉप्टरमध्ये पायलट रॉबिनसह 5 महिला आणि 2 पुरुष होते. हे हेलिकॉप्टर अहमदाबाद येथील एअरोट्रान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर गुजरातच्या अहमदाबाद येथील एअरोट्रान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते. ते बेल (बेल-व्हीटी-क्यूएक्सएफ) हेलिकॉप्टर होते.

17 मे: केदारनाथमध्ये एअर अॅम्ब्युलन्स अपघात
17 मे रोजी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर कोसळला. हेलिकॉप्टरमध्ये पायलट, डॉक्टर आणि नर्स असे तीन जण होते. तिघेही सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधून एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला येत होते. लँडिंग करताना अचानक हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले आणि जमिनीवर कोसळले. हेलिकॉप्टरच्या टेल बूम तुटल्यामुळे हा अपघात झाला.

7 जून: हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग
तांत्रिक बिघाडामुळे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे 7 जून रोजी रस्त्यावर हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. यादरम्यान, हेलिकॉप्टरचा मागील भाग कारवर पडला आणि तुटून बाजूला पडला. यामध्ये एका कारचेही पूर्णपणे नुकसान झाले होते. तर हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे महामार्गावर बांधलेल्या दुकानाचे शेडचे नुकसान झाले. यादरम्यान, दुकानात बसलेल्या लोकांनी पळून जाऊन आपले प्राण वाचवले. हेलिकॉप्टरने बदासू हेलिपॅडवरून केदारनाथसाठी उड्डाण केले, ज्यामध्ये पायलटसह 6 प्रवासी होते. अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. याशिवाय इतर प्रवासी सुरक्षित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *