महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – रिअलमी कंपनीने गेल्या आठवड्यात भारतात आपले दोन नवीन बजेट स्मार्टफोन Realme C15 आणि C12 लाँच केले. यातील रिअलमी C12 फोनसाठी दोन दिवसांपूर्वी पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता C12 च्या तुलनेत पॉवरफुल असलेला Realme C15 फोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आज (दि.27) दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबासइटवर (Realme.com) या फोनसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही ऑफरही आहेत. सेलमध्ये Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर आणि Axis Bank Buzz क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांनाही 5 टक्के सवलत मिळेल. याशिवाय, पार्टनर ऑफरअंतर्गत एक्स्चेंजमध्ये हा फोन खरेदी केल्यास 6 महिने गुगल वन ट्रायल फ्री मिळेल. तसेच दरमहा 1,111 रुपये नो-कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचे पर्यायही आहेत.
Realme C15 स्पेसिफिकेशन्स :-
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच मिनी-ड्रॉप (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. ड्युअल सिम कार्ड सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित रिअलमी यूआयवर कार्यरत आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी GE8320 GPU आहे. या फोनसाठी 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असे दोन व्हेरिअंट आहेत. इनबिल्ट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्यायही आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप (13MP + 8MP + 2MP + 2MP) आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, 4जी, जीपीएस, ग्लोनास आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. तसेच 18 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर अशा दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. Realme C15 च्या 3GB रॅम व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आणि 4GB रॅम व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे.
Realme C15 किंमत :-
कंपनीने रिअलमी C15 हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. याशिवाय 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे.