Horoscope Today दि. २२ जून ; आज तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल ..……..….…… ; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जून ।।

मेष राशिभविष्य (Aries )
नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. आर्थिक कमतरता भरून निघेल. मानसिक चंचलता दूर करावी.

वृषभ राशिभविष्य (Taurus)
मनाजोगी खरेदी करता येईल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल.

मिथुन राशिभविष्य (Gemini)
कामाचा व्याप वाढू शकतो. भावंडांची जबाबदारी अंगावर पडेल. अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer)
जवळच्या मित्रमैत्रिणींची गाठ पडेल. बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

सिंह राशिभविष्य (Leo)
शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्यातील छुपे कलागुण सर्वांसमोर येतील.

कन्या राशिभविष्य (Virgo )
जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल. मैत्रीचे संबंध अधिक घनिष्ट होतील. नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. पित्त विकारात वाढ संभवते. हातापायाला किरकोळ दुखापत होऊ शकते.

तूळ राशिभविष्य (Libra)
क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आळस झटकून कामे करावी लागतील.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio)
जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. शांत व संयमी विचार करावा. आपली संगत एकवार तपासून पहावी.

धनू राशिभविष्य (Sagittarius)
जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. समोरील कामे आधी पूर्ण करावीत. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल. काही खर्च अचानक सामोरे येतील.

मकर राशिभविष्य (Capricorn)
क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius)
हलका व सकस आहार घ्यावा. वादाचे प्रसंग चिघळू शकतात. जोडीदाराशी समजुतीने वागावे लागेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक गोष्टीपासून दूर राहू नका.

मीन राशिभविष्य (Pisces)
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. आवडत्या कलेचा आनंद घ्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *