‘चला हवा येऊ द्या’चं जोरदार कमबॅक! पण हुकमाचा एक्काच पडला बाहेर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जून ।। ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीच्या विनोदी कार्यक्रमाविषयी एक मोठे अपडेट समोर आले आहे. 10 वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र गेल्या वर्षी काही कारणास्तव हा कार्यक्रम बंद करण्यात आला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता मात्र असे अपडेट आहे की Chala Hawa Yeu Dya हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे. झी मराठीने प्रोमो शेअर करत या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे.

CHYD ने ऑगस्ट 2014 ते मार्च 2024 या 10 वर्षांच्या कालावधीत प्रेक्षकांना खळखळून हसवले. दिग्दर्शक-अभिनेता डॉ. निलेश साबळेने या कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती. याशिवाय भाऊ कदम, सागर कारंडे , भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, विनीत भोंडे, अंकुर वाढावे, तुषार देवल इ. आणि इतरही असंख्य कलाकार या कार्यक्रमामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते.

https://www.instagram.com/zeemarathiofficial/?utm_source=ig_embed&ig_rid=30a110a6-79ec-4e3b-b23d-f07be696b7fd

नव्या ढंगात नव्या पर्वाची घोषणा
आता ‘चला हवा येऊ द्या’चे केवळ नवीन पर्व येणार आहे असे नाही, तर हा कार्यक्रम वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार या शोसाठी विनोदवीरांची ऑडिशन होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील कलाकारांना या मंचावर कला सादर करण्याची संधी मिळेल.

कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये अशी घोषणा करण्यात आली की, ’10 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक वादळ आलं होतं… 1137 एपिसोडस… 9 सीझन… 10 वर्ष! फक्त त्याचीच हवा होती. आता तेच वादळ पुन्हा येणार, कॉमेडीची सुपारी अख्ख्या महाराष्ट्राला देणार! कॉमेडीचा डॉन कोण आता ऑडिशन होणार’. झी मराठीवर लवकरच हा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण अद्याप ऑडिशन कधी कोणार किंवा कार्यक्रम कधीपासून सुरू होणार याविषयी तपशील समोर आलेला नाही.

हुकमी एक्के गायब

दरम्यान झी मराठीने शेअर केलेला हा प्रोमो काहीच वेळात व्हायरल झाला असला तरी, यामध्ये कार्यक्रमाचे काही हुकमी एक्के गायब आहेत आणि काही नवीन कलाकारांची एन्ट्री झाल्याचे दिसते आहे. या नव्या प्रोमोमध्ये श्रेया, भाऊ, कुशल, भारत या कलाकारांची झलक दिसली. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेही या प्रोमोमध्ये आहे, मात्र 10 वर्ष या कार्यक्रमाची धुरा एकहाती सांभाळणारा डॉ. निलेश साबळे दिसला नाही, शिवाय विनोदवीर सागर कारंडेही यामध्ये नाही. इतरही काही कलाकार आहेत ज्यांनी हा कार्यक्रम गाजवला होता, पण त्यांची झलक यामध्ये दिसली नाही. आता केवळ या प्रोमोमधून ते गायब आहेत की कार्यक्रमातही ते झळकणार नाहीत, हे शो सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *