महाबळेश्वर-तापोळा ! 90 कोटी खर्चून बनवलेला ‘हा’ रस्ता तुटला; मुसळधार पावसाचा कहर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जून ।। मान्सूनच्या पावसाने महाबळेश्वर तालुक्यात (Mahabaleshwar Tapola Road) अक्षरश: कहर केला असून मुसळधार पावसाने तापोळा विभागाला (Tapola Division) जोडणारा महाबळेश्वर-तापोळा रस्ता वाहून गेला आहे. अनेक रस्त्यांवर दरडी कोसळणे, माती वाहून येणे असे प्रकार झाल्याने या विभागातील जनजीवन ठप्प झाले असून प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

बुधवारी रात्रीपासून न थांबता सतत पाऊस कोसळत असल्याने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पावसाने तापोळा-महाबळेश्वर रस्ता झोळाईची खिंड ते चिखली शेड यादरम्यान रस्ताच मोठ्या प्रमाणात तुटला आहे. हा रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात तुटला आहे, की दुरूस्त करणे ही अवघड जाणार आहे.

तर वाघेरा फाट्याच्या वरच्या बाजूला याच रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही दरड जेसीबीच्या साह्याने हटवण्याचे काम दुपारी सुरू करण्यात आले आहे. झोळाईची खिंड या ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात तुटला असून महाबळेश्वरवरून तापोळ्याला येणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. रस्ता मोठ्या प्रमाणात तुटल्याने दुरुस्त करणे ही अवघड होणार आहे

त्याचप्रमाणे वाघेरा फाट्यापासून वेंगळे ते गोगवेकडे जाणारा रस्त्यावर वेंगळे गावच्या हद्दीत या रस्त्यावर डोंगरातील मातीचा मलमा वाहून आल्याने हा रस्ताही वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. दरम्यान, रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेमुळे तापोळ्यामध्ये पर्यटक अडकून पडले आहेत. पर्यायी रस्तेही खराब होत असल्याने या भागातील सर्वसामान्य लोकांना, पर्यटकांना बाहेरच्या जगाशी संपर्क साधणे, या अडचणीतून बाहेर पडणे अवघड झाले आहे.

गेल्या वर्षी साधारणतः 90 कोटी रुपये खर्च करून महाबळेश्वर-तापोळा हा रस्ता बनवला असून या रस्त्याचे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सातत्याने आरोप होत असतात आणि हाच रस्ता मोठ्या प्रमाणात तुटून वाहिल्याने निकृष्ट दर्जाच्या कामावर शिक्कामोर्तब झाल्याचे सिद्ध होत आहे, असे बोलले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *