महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जून ।। राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. सर्वच भागांमध्ये वरुणराजा धो-धो बरसतोय. अनेक नद्यांना पूर आले आहेत तर प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो होत आहेत. यातच एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय. निसर्गाची ताकद काय असते, हे या व्हिडीओतून दिसून येतंय.
https://www.facebook.com/reel/1462624858060203
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक भलामोठा वृक्ष अख्खाचे अख्खा पुराच्या पाण्यात वाहून येततोय. नदीवर एक अजस्त्र पूल आहे. झाड हळूहळू पुराच्या पाण्यासोबत पुलाच्या जवळ येताना दिसतंय. आता काय होईल, असा प्रश्न उपस्थितांना पडलेला असेल. कारण पुलाच्या भोवती बघ्यांची गर्दी झालेली दिसतेय.
झाड वाहून आलं अन् पुलाला धडकलं खरं, पण थांबलं नाही. एवढ्या मोठ्या वटवृक्षाचे अक्षरशः दोन भाग झाले. एक भाग पुलाखालून वाहून गेला तर दुसरा भाग पुलाच्या भिंतीला धडकून सपाट झाला आणि त्याही फांद्या पुलाखालून वाहुन गेल्या. पाण्याची ताकद, मानवनिर्मित पुलाचं बळ आणि वृक्षाचं बळ; यातून दिसून आलं.
व्हिडीओ बघताना वाटतं एकतर झाड अडकून पडेल अथवा पूलाला काहीतरी धोका होईल. परंतु काहीही होत नाही. सगळंकाही अलगद, सुरळीत घडून जातं. जेव्हा झाड पुलाला धडकतं तेव्हा अस्ताव्यस्त झालेल्या फांद्या उंचच उंच जातात आणि पुलाला धडकून पुन्हा घाली येऊन सपाट होतात.
