महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांची सत्ता येणार हे अद्याप स्पष्ट झालं असलं तरी त्यांना एक धक्का मात्र बसला आहे. त्यांचे कट्टर विरोधक चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून विजयी झाले आहेत. त्यामुळे तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलने खातं खोललं आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत 13 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये 12 जागांवर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. तर सांगवी गटातून सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे विजयी झाले आहेत. त्यामुळे अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.
निवडणुकीत वयावरुन टीका, तावरेंचे सडेतोड प्रत्युत्तर
आता तुमचं वय झालं, 85 वर्षे झाले तरी थांबायला तयार नाही अशी टीका अजित पवारांनी चंद्रराव तावरेंवर केली होती. त्यावर चंद्रराव तावरेंनीही टीका केली होती. उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे चेअरमन व्हायला निघाले आहेत. त्यांनी तालुक्याची प्रतिष्ठा कमी केली असं तावरे म्हणाले होते. त्याचसोबत उपमुख्यमंत्री मीच, मंत्री मीच, आमदार मीच, कारखान्याचा चेअरमन मीच… सगळीकडे मीच अशी अजित पवारांची वृत्ती असल्याची टीका त्यांनी केली होती.
माळेगाव सहकारी साखर काऱखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.
या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शरद पवार गटाच्या एकाही उमेदवाराला आतापर्यत यश आलं नाही. 21 पैकी 20 जागा या अजित पवारांच्या पारड्यात पडणार आहेत हे स्पष्ट झालं आहे.
ब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
4) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
5) सौ संगीता कोक
6) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
7) शिवराज जाधवराव
8) राजेंद्र बुरुंगले
9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे