महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाली नाही. सोन्याचे दर आज स्थिर आहेत. त्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण बुधवारीच सोन्याचे दर प्रति ग्रॅम २१० रुपयांनी आणि प्रति दोळा २१०० रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे आज त्यांना कालच्याच किंमतीत सोनं खरेदी करता येणार आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर ९,८९५ रुपये प्रति ग्रॅम आहे. तर २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर ९८,९५० रुपये इतके आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९,०७० रुपये प्रति ग्रॅम आहे. तर १ तोळा सोन्याचे दर ९०,७०० रुपये इतके आहे. तसंच, आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७,४२ रुपये प्रति ग्रॅम आहे. तर १ तोळ्यासाठी तुम्हाला आज ७४,२१० रुपये मोजावे लागणार आहेत.
लग्नसराई त्याचसोबत इतर कार्यक्रमांसाठी सोनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जास्त असतो. सोन्याचे दर प्रत्येक शहरानुसार वेगळे असतात. अनेकदा असे होते की मुंबईत सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत कमी असतात. महत्वाचे म्हणजे आज चांदीच्या दरात देखील काहीच बदल झाली नाही. दर बुधवारी जेवढे होते तेवढेच आहेत. त्यामुळे चांदी देखील खरेदी करण्यासाठी आज चांगली संधी आहे.
आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम १०८ रुपये आणि प्रति किलो ग्रॅम १,०८,००० रुपये इतकी आहे. भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींनुसार निश्चित केली जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चलनाच्या हालचालीवर देखील चांदीच्या किंमती अवलंबून असतात. जर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि आंतरराष्ट्रीय किमती स्थिर राहिल्या तर भारतात चांदी अधिक महाग होईल.