IND vs ENG: भारतीय ताफ्यातून जसप्रीत बुमराह बाहेर ? : दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, जाणून घ्या.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। भारतासाठी आता सर्वात मोठी बातमी आली आहे. कारण भारतासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू हा जसप्रीत बुमराह आहे. बुमराह आता दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण आता बुमराह हा दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे की नाही, हे समोर आले आहे.

बुमराह किती कसोटी सामने खेळणार…
वर्कलोड मॅनेजमेंटनुसार जेव्हा भारतीय संघातीच निवड करण्यात आली होती. त्यावेळीच जसप्रीत बुमराह किती सामने खेळणार हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी जसप्रीत बुमराह हा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील फक्त तीनच लढती खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

बुमराहने याबाबत काय सांगितले होते…
जसप्रीत बुमराह याबाबत म्हणाला होता की, ” माझ्या फिटनेसबाबत बीसीसीआय आणि निवड समितीबरोबर मी चर्चा केली होती. या दौऱ्यासाठी संघ निवडताना वर्कलोड मॅनेजमेंट काय असेल हे मी त्यांना सांगितले होते. त्यामुळेच मी संघाचे कर्णधारपद भूषवू शकणार नाही, असे म्हटले होते. पण त्याचवेली मी पाचही कसोटी क्रिकेट सामने खेळणार नाही, असे ठ़रले होते. त्यावेळी असे ठरले होते की, मी तीन कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये मी एक, तीन आणि पाच क्रमांकाचे सामने खेळू शकतो, असे ठरले होते. पण त्याचवेळी यामध्ये बदल केला जाऊ शकतो, असेही म्हटले गेले होते, म्हणजे संघाला गरज असेल तर मी पहिल्या तिन्ही सामन्यांत खेळू शकतो. ”

जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, जाणून घ्या..
जसप्रीत बुमराहबाबत संघातील सूत्रांनी एनडीटीव्हीला माहिती दिली आहे, त्यानुसार बुमराह आता दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बर्मिंगहम कसोटी सामन्यात बुमराह भारतीय संघामधून खेळताना दिसणार नाही. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

जसप्रीत बुमराहने पहिल्याच डावात ५ बळी मिळवले होते. त्यामुळे भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवता आली होती. पण आता बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात नमसल्यामुळे भारताची गोलंदाजी अधिक बोथट होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *