जुलैमध्ये महाराष्ट्रात किती दिवस बँका राहणार बंद ? ; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। जुलै २०२५ मध्ये विविध सण-उत्सव व साप्ताहिक सुट्ट्या यामुळे एकूण १३ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. यात ४ रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे.

यातील सर्व सुट्ट्या सर्वच राज्यांत नाहीत. त्यामुळे राज्यनिहाय सुट्यांची संख्या कमी जास्त होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार जुलैमधील बँकांच्या सुट्या पुढीलप्रमाणे आहेत.

३ जुलै : खर्ची पूजा, त्रिपुरा

५ जुलै : गुरु हरगोविंदसिंहजी जन्मोत्सव, जम्मू-काश्मीर

६ जुलै : रविवार, देशभर

१२ जुलै : दुसरा शनिवार, देशभर

१३ जुलै : रविवार, देशभर

१४ जुलै : बेह दीन्खलाम, मेघालय

१६ जुलै : हरेला सण, उत्तराखंड

१७ जुलै : यू तिरोतसिंह पुण्यतिथी, मेघालय

१९ जुलै : केरपूजा, त्रिपुरा

२० जुलै : रविवार, देशभर

२६ जुलै : चौथा शनिवार, देशभर

२७ जुलै : रविवार, देशभर

२८ जुलै : द्रुक्पा त्से-जी, सिक्कीम

थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यात 6 सुट्ट्या असणार आहेत. म्हणजेच 31 पैकी 25 दिवस राज्यातील बँका कार्यरत असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *