CNG-PNG Rate Fall: वाहनधारकांना दिलासा मिळणार? ; CNG-PNG स्वस्त होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे.त्यामुळे ज्या वाहनांमध्ये सीएनजी आणि पीएनजी गॅस वापरला जातो त्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या २-३ दिवसांत याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) ने नवीन टॅरिफ रेग्युलेशनला मंजुरी दिली आहे. यामुळे CNG-PNG गॅसच्या किंमती कमी होणार आहे.

कशी ठरवली जाते CNG-PNG ची किंमत?
CNG-PNG गॅसच्या किंमती वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळ्या असतात. जितकी जास्त लांब गॅस फिलिंग स्टेशन किवा पाइपलानचे ठिकाण असेल, त्यावर CNG-PNG गॅसच्या किंमती ठरवल्या जातात. परंतु आता नवीन नियमांनुसार युनिफाइड टॅरिफ सिस्टीम लागू होणार आहे. यामध्ये फक्त लांबचे सीएनजी पंप नाही तर एका ठिकाणावरील वेगवेगळ्या सीएनजी पंपावर गॅसच्या किंमती सारख्या असणार आहेत.

फायदा
गाझियाबाद, मेरठ दिल्लीमध्ये CNG-PNG च्या किंमती स्थिर असतील. फक्त जी शहरे लांब आहेत. ज्यांनी सीएनजीसाठी अंतरामुळे जास्त पैसे मोजावे लागत होते. त्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच यामुळे दुर्गम भागात सीएनजी-पीएनजी कनेक्शन वाढवण्यासाठी सरकारला प्रोत्साहन मिळेल. जिथे गॅसची उपलब्धता वाढेल आणि किंमतीदेखील कमी होऊ शकतात.

आता पर्यंत देश ३ विभागात विभागला जात होता. आता फक्त २ झोनमध्ये विभागला जाईल. त्यामुळे या दोन झोनमधील शहरांमधील सीएनजी गॅसच्या किंमती सारख्या असणार आहे.

नवीन नियम कधी लागू होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन टॅरिफ नियम २-३ दिवसांत अधिकृतपणे जाहीर केला जाईल. त्यानंतर कंपन्या त्यांच्या सीएनजी गॅसचे दर ठरवतील. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना दिसेल. आता नवीन टॅरिफ सिस्टीम झाल्यानंतर देशभरात १२ कोटी घरगुती पीएनजी कनेक्शन आणि १७,५०० सीएनजी स्टेशन उभारण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *