ऑफिसला या, नाही तर राजीनामा द्या! अ‍ॅमेझॉनने सोडले साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना फर्मान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। जगभरातील टेक कंपन्यांनी सुरू केलेल्या कर्मचारी कपातीमुळे नोकरी जाण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेली असताना अ‍ॅमेझॉन कंपनीने काढलेल्या एका नव्या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अ‍ॅमेझॉनने जगभरातील साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. जे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत त्यांनी तत्काळ कार्यालयात येऊन काम करावे. अन्यथा राजीनामा देऊन मोकळे व्हावे. अ‍ॅमेझॉनच्या या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे सिएटल, आर्लिंग्टन (व्हर्जिनिया), वॉशिंग्टन डीसी, यासारख्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम करावे, असे कंपनीने बजावले आहे. बऱ्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करणे शक्य नाही. त्यामुळे बरेच कर्मचारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. जे कर्मचारी कार्यालयात येणार नाही त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जर राजीनामा दिला तर त्यांना कोणत्याही प्रकारचा पगार अतिरिक्त दिला जाणार नाही.

अ‍ॅमेझॉनचा हा निर्णय ‘रिटर्न टू ऑफिस’ या धोरणाचा एक भाग आहे. कर्मचारी जर कार्यालयात येऊन काम करत असेल तर सहकार्य, इनोव्हेशन आणि उत्पादन वाढते. वर्क फ्रॉम होममुळे हे सर्व कमी झाले होते, असे कंपनीचे म्हणणे आहे. अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्रीमध्ये पडसाद उमटले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *