महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। जून महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे. पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या महिन्यात ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता जून महिना संपायला अवघे २ दिवस उरले आहेत.या दोन दिवसांत जरी जूनचा हप्ता जमा केला तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी ४-५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेत जून-जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे. दर महिन्यात सणासुदीचा मूहूर्त साधून पैसे जमा केले जातात. जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकदाशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी दिली जाऊ शकते. जर असेल झाले तर ६ जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
जून आणि जुलैचा हप्ता एकाच दिवशी जमा होणार की नाही याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित हे पैसे एकत्र येऊ शकतात किंवा कदाचित हे पैसे दोन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दिले जाऊ शकतात. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.