महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
केलेल्या कामातून समाधान मिळेल. योग्य तर्क वापरता येईल. आपले विचार चलाखीने मांडाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. लहान प्रवासाचा योग येईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
बौद्धिक हटवादीपणे वागणे राहील. तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल. जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा. हसतहसत कामे साधून घ्या. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कौटुंबिक खर्च आवरता ठेवावा.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
तरूणांशी मैत्री कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. वरिष्ठांच्या संपर्कात राहाल. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा. लेखन क्षेत्रातील लोकांना मान-सन्मान लाभेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अत्यंत कुशलतेने वागाल. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. योग्य कल्पनाशक्ति वापराल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope )
कफ विकाराचा त्रास संभवतो. मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल. संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या व्यवसायात व्यवहार कुशलता दाखवावी. जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा. वादाच्या मुद्दयात सहभाग घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींची आवड जोपासता येईल. कल्पनाशक्तीला वाव देता येईल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
तुमचे बुद्धी-कौशल्य पणाला लागू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. भडक शब्दांचा वापर टाळावा. आवडते पदार्थ खाण्याबाबत आग्रही राहाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope )
गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. हट्टीपणा थोडा कमी करावा लागेल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील.