ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक करदात्यांनी आयटीआर भरले आहेत. दरम्यान, आयटीआर भरताना अनेक कागदपत्रे आवश्यक असतात. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्हाला आयटीआर फाइल करता येणार नाही. आयटीआर ऑनलाइन पद्धतीने फाइल करु शकतात. आयटीआर फाइल करताना पासवर्ड टाकावा लागतो. जर पासवर्ड विसरला तर काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. परंतु आता तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही पासवर्डशिवायदेखील आयटीआर फाइल करु शकतात.

जर तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड लक्षात नसेल तर काही हरकत नाही. तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्याचीही गरज नाही. फक्त आयटीआर फाइल करताना तुम्हाला नेट बँकिंगची गरज भसाणार आहे. देशातील बँका तुम्हाला नेट बँकिंगद्वारे इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची सुविधा देते. ही पद्धत सोपी आणि सुरक्षित आहे.

यासाठी तुम्हाला आयटीआर फाइल करताना मदत होणार आहे. तुम्हाला सर्वात आधी इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला नेट बँकिंग हा ऑप्शन दिसणार आहे. तिथे जाऊन थेट संपर्क करायचा आहे.

ICICI बँकेकडून आयटीआर फाइल करा

तुम्ही ICICI बँकेच्या नेट बँकिंग अकाउंटवरुन आयटीआर फाइल करु शकतात. यासाठी तुम्हालाICICI नेट बँकिंग अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल.

यानंतर Payments and Transfers मध्ये जा.

यानंतर Manage Your Taxes वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स ई-फायलिंग ऑप्शन दिसणार आहे.त्यावर क्लिक करुन तुम्ही थे

इन्कम टॅक्स पोर्टलवर जाणार आहे.

येथे तुम्ही कोणत्याहा पासवर्डशिवाय आयटीआर फाइल करु शकतात. याचसोबत तुम्हाला Form 26AS, टॅक्स कॅल्क्युलेटर, रिटर्न डाउनलोड करणे तसेच ई पे टॅक्स ही कामे करता येणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *