महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। हिंदीसक्तीच्या निर्णय रद्द झाल्याच्या विजय मेळाव्यातील ठाकरेंच्या एकीची ही दृश्य….यातूनच ठाकरे बंधूंनी युतीचा स्पष्ट संदेश दिलाय. या विजयी मेळाव्यातून महाराष्ट्रात ठाकरे बंधू हाच विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलाय.
खरंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं.. तर ठाकरे सेना आणि मनसेसह काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचीही मोठी पिछेहाट झाली…मात्र सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय घेतला आणि प्रचंड बहुमतातील सरकारला मराठी जनतेनं नमवलं…. नेमका हाच धागा पकडून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय.
मात्र आता ठाकरेंनी रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिल्याने ठाकरे बंधूंच्या रुपाने विरोधी पक्षाची ताकद वाढणार आहे… ती नेमकी कशी? पाहूयात…..
विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23 टक्के मतं
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे ठाकरे बंधूंना सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास वाव
बहुमताच्या बळावर काही निर्णय लादल्यास रस्त्यावरची लढाई लढणं शक्य
ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस येणार
एका सर्व्हेनुसार मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीला 52 टक्के लोकांचं समर्थन
एकीकडे विधानसभेत विरोधक शक्तीहीन बनल्याची चर्चा आहे… त्याच पार्श्वभुमीवर रस्त्यावरच्या लढाईतून हिंदीसक्तीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडणारे ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा मोठा चेहरा म्हणून पुढे आलेत…. आता एकीची वज्रमूठ आवळून ठाकरे बंधू महायुतीच्या सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई लढणार का? आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही एकीचं बळ दाखवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.