Amdar Niwas: आमदार निवासात शिळं जेवण दिलं : बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन डोक्यावर घेतलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। वारंवार आपल्या वक्तव्यामुळे किंवा कोणत्या ना कोणत्या कृतीमुळे चर्चेत येणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena MLA) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikawad) पुन्हा एकदा राड्यामुळे चर्चेत आले आहेत. शीळ व निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी (Sanjay Gaikawad) आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी आमदार निवासमधील कॅन्टीन व्यवस्थापकाला देखील सुनावलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (मंगळवारी,ता 8) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डर प्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यानंतर गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याचंही ते बोलताना म्हणाले आहेत.

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण
आकाशवाणी आमदार वसतिगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचंही यावेळी दिसून आलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला. डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावरती व्हायरल झाले आहेत.

नेमकं काय घडलं?
काल (मंगळवारी,ता 8) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डर प्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यानंतर गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. त्याचबरोबर कोणीही जेवणाचं बील देऊ नये असं सांगण्यात आलं, त्याचवेळी आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरच्या कानशिलात लगावली.यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याचंही ते बोलताना म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *