महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारच्या मध्यरात्रीपासून आज बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत पडलेल्या संततधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यापैकी ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वात जास्त जनजीवन प्रभावीत झाले आहे. दुसऱ्या दिवशीही पावसाने ब्रम्हपुरी तालुक्याला झोडपून काढले असून 145.02 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दमदार पावसामुळे ब्रम्हपुरीसोबत सुमारे ३० गावांचा संपर्क तुटला आहे. ब्रम्हपुरी गडचिरोली, ब्रम्हपुरी वडसा या प्रमुख मार्गांसह ग्रामीण भागातील 26 मार्ग बंद झाले आहेत.
पूरस्थिती असलेल्या भागातील सुमारे हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली आली असून त्यामध्ये आवत्या, रोवणी व पऱ्हे पुरात सापडले आहे. पूरस्थितीमुळे सर्व पिके खरडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती बिकट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर वरोरा 2, सावली 5, गोंडपिपरी 4, सिंदेवाही 2,नागभिड 4 मार्ग बंद आहेत.
सोमवारच्या मध्यरात्रीपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात जास्त पूरस्थिती ही ब्रम्हपुरी तालुक्यात निर्माण झाली आहे. सोमवार व मंगळवारी दोन्ही दिवस ब्रम्हपुरी तालुक्याला पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन प्रभावीत झाले आहे. आज बुधवारी सकाळी अकरा वाजतापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु आज सकाळच्या आकडेवारीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यात 145.02 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ लागून असलेल्या चिमुर तालुक्यात 151.04,नागभीड तालुक्यात 150.03, 45.2, सिंदेवाही तालुक्यात 92.08 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी व मंगळवारी दोन्ही दिवस जोरदार पावसाने झोडपून काढल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे.
तालुक्यात झालेला संततधार पाऊस व भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. नदीच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावे प्रभावित झाली आहेत. त्यामध्ये नदी काठावरील लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव आदींचा समावेश आहे. बचाव पथकाने येथील 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. आणखी काही लोकांना रेस्क्यू केल्या जाण्याची शक्यता आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदी काठावरील गावांचा धोका निर्माण झाला आहे. पुरस्थिती गंभरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात ३० गावांचा संपर्क तुटला
ब्रम्हपुरी हे तालुक्याचे ठिकाण आहे. संततधार पावसामुळे तालुक्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पण्याचा विसर्ग वैनगंगे होत असल्याने आलेल्या पुरामुळे तालुक्यातील तिस गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामध्ये मांगली, गवराळा, जुगनाळा, चौगान,गांगलवाडी, पारडगाव, बेटाळा, बोरगाव, चिंचोली, हरदोली, सुरबोडी, सौंदरी, झिलबोडी, परसोडी, नवेगाव, कोथूर्णा, सोनेगाव, बोंडेगाव , सावलगाव, चिखलगाव, लाडज, निलज, कन्हाळगवा, अऱ्हेर, नवरगाव, पिंपळगाव, नांदगाव, नान्होरी आदी गावांचा समोवश आहे. बारा तासापासून आदी गांवाचा संपर्क ब्रम्हपुरी तालुक्यासोबत तुटला आहे.
जिल्ह्यातील 46 मार्ग बंद, वाहतूक ठप्प
संततधार पावसामुळे आलेल्या पुरपरिस्थीने जिल्ह्यातील दोन प्रमुख मार्गांसह 46 अंतर्गत मार्ग मागील बारा तासापासून बंद आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त ब्रम्हपुरी तालुक्यातील 26 मार्ग, सावली 13, गोंडपिपरी 4, ,नागभीड 2 व वरोरा 1 मार्गाचा समावेश आहे. त्यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील ब्रम्हपुरी – वडसा, मेंडकी ते नवेगाव खुर्द,ब्रम्हपुरी ते चांदगाव,ब्रम्हपुरी बोरगाव कडे जाणारा मार्ग,रानबोथली ते ब्रम्हपुरी रोड,खंडाळा ते कान्हाळगाव,कन्हाळगाव ते बेटाळा, कालेता ते नानोरी,निलज, बेलपातळी, मुई, मांगली मार्ग, उचली ते मौशी, कुर्झा ते अन्हेर, गांगलवाडी ते आरमोरी-ब्रम्हपुरी, पारडगाव ते ब्रम्हपुरी, चिखलगाव- लाडज, खरकडा (पिंपळगाव) ते नीलज,बेटाळा साठी जाण्याचे दोन्ही रस्ते बंद, पारडगाव ते आरमोरी,आवळगाव ते गांगलवाडी, कुडेसावली मुडझा, आरमोरी रोड बेटाळा ते किन्ही,किन्ही- आरमोरी, खरकाडा ते रणमोचण,गांगलवाडी ते आवळगाव,खरकाडा ते पिंपळगाव तसेच पिंपळगाव (भोसले) येथील मार्ग बंद झालेलाआहे. येथील वाहतु ठप्पा झाली आहे. चिखलगाव – लाडज निर्माणधीन पूल बुडण्याच्या मार्गावर तर गांगलवाडी ते मुडझा व वांद्रा ते एकारा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे.
सावली तालुक्यात सावली जिबगाव हरांबा, लोढोली ते चिंचडोह, जीबगाव, लाडज, जिबगाव- उसेगाव, साखळी सिर्सी, बोरमाळा -सावली, अंतगरगाव – निमगाव, दाबगाव -मौशी, हरणघाट-कवठी, कढोली सिर्सी, सिर्सी- जिबगसच, हरांबा- सावली असे तेरा मार्ग बदं आहेत. तर गोंडपिपरी तालुक्यातील चार मार्गाचा समावेश आहे. त्यामध्ये गोंडपिरी आष्टी आष्टी या प्रमुख मार्गासह गोंडपिरी -पोंभर्णा, फुर्डी हेटी- कुलथा, राळापेठ-तारसा इत्यादींचा समोवश आहे.
नागभीड तालुक्यात बनवाही येथील नाल्यावर पूर असल्याने मार्ग बंद झाला तर बाम्हणी गावाजवळ रस्तयावर झाड पडल्याने नागभीड मार्ग बंद झाला होता. तसेच वरोरा तालुक्यातील सोईट कोसारा जाणारा मार्ग पुलावर पाणी वढल्याने बंद झाला आहे. जिल्ह्यात एकूण 46 मार्ग बंद आहेत.
हजारो हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली
जिल्ह्यात सर्वत्र संततधार असला तर सर्वाज जास्त पूरस्थिती ब्रम्हपुरी तालुक्यात निर्माण झाली आहे. येथील नदी काठावरील व लगतच्या परिसरात सध्या पुराने वेढा घातल्याने समुद्राचे स्वरूप आले आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर शेजजमिन पूराच्या पाण्याखाली आली आहे. दरवर्षी येथील शेजजमिन पुराच्या पाण्यामुळे खरडून जाते. ज्यामध्ये पिके वाहुन जातात. तालुक्यात धाना हे प्रमुख पिक आहे. शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे भरले आहेत. काही ठिकाणी अवत्या भरण्यात आला आहे. तर काही ठिकाणी रोवणी झाली आहे. तालुक्यातील रोवणी, आवत्या, धानाचे पऱ्हे सध्या पुराच्या पाण्याखाली सापडले आहे. पुरामुळे हे सर्व पिके खरडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी सध्या विविध समस्यांनी ग्रस्त असतानाच वैनगंगेच्या पाण्याच्यापातळीत वाढ झाल्याने नदी नाले भरभरून वाहत आहेत. परिणाम शेतशिवारत पुरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या तरी पुर ओसरण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरची पिके नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गोसेखुर्द धरणातील पाण्यामुळे वैनगंगेच्या पातळीत वाढ
भंडारा जिल्ह्यात मागील तिन दिवसांपासून आज बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत संततधार पाऊस झाला आहे. त्यामुळे गोसेखर्द धरणातील पूर्णच 33 दरवाजे उघडण्यात आले आहे. 21 दरवाजे अडीच मिटर तर 22 दरवाजे 2 मिटरने उघडण्यात आले आहे. तेथून सतत पाण्याचा विसर्ग होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ही वाढ सतत होत आहे. सध्या मध्यप्रदेशातील संजय सरोवर, पुजारी टोला येथील 8 गेट व संजय सरोवर येथील 2 गेट आणि धापेवाडा येथून गोसेखर्द ध्रणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुन्हा वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली आहे, परंतु पुन्हा पाऊस कोसळला ब्रम्हपुरी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्तया नाकारता येत नाही.सध्यातरी वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना धोका तुर्तास कायम आहे. तसेस शेती पाण्याखाली जास्त दिस बुडून राहिल्यास मोठ्या नुकसानीला समोर जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.