उज्ज्वल निकम यांना खासदारकीची लॉटरी, राष्ट्रपतींनी ४ जणांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी ४ सदस्यांना नामनिर्देशित केले आहे. यामध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यांसह अनेक चर्चित खटले लढणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रसिद्ध इतिहासकार व शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून चार दिग्गजांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. गृहमंत्रालयाकडून शनिवारी रात्री याबाबत प्रसिद्धीपत्रका जाहीर करण्यात आले.

वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर भाजपने निकम यांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रपती कोट्यातून त्यांची राज्यसभेत नियुक्ती करण्यात आली आली आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करत निकम यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून त्यांना संधी मिळाली आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला आणि अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये निकम यांनी सरकारी वकील म्हणून सहभागी झाले.

हर्षवर्धन श्रृंगला हे १९८४ च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) अधिकारी आहेत. ३५ वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत हर्षवर्धन यांनी राजधानी नवी दिल्लीसह परदेशात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते २०१९ मध्ये अमेरिकेतील भारताचे राजदूत होते. यापूर्वी ते बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त आणि थायलंडमधील भारताचे राजदूत म्हणूनही कार्यरत होते. याशिवाय त्यांनी फ्रान्स (युनेस्को), अमेरिका (संयुक्त राष्ट्र, न्यूयॉर्क), व्हिएतनाम (हनोई आणि हो ची मिन्ह सिटी), इस्रायल आणि दक्षिण आफ्रिका (डरबन) येथेही काम केले आहे. हर्षवर्धन यांनी परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (महासंचालक) म्हणून काम केलेय. २९ जानेवारी २०२० रोजी ते परराष्ट्र मंत्रालयाचे 33 वे परराष्ट्र सचिव बनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *