![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। दिल्लीवरून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे (Delhi To Goa Indigo Flight) बुधवारी रात्री मुंबईमध्ये आपत्कालीन (इमरजन्सी) लँडिंग करण्यात आले. १९१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे हवेतच एक इंजिन खराब (Indigo Flight Engine failure) झालं होतं. तब्बल १७ मिनिट विमान हवेतच घिरट्या मारत होतं. १९१ प्रवाशांचा जीव मुठीत होता, पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचा जीव वाचला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्व १९१ प्रवासी सुरक्षित आहेत.
दिल्लीहून गोव्याला जाणारं विमान इंजिन खराब असल्यामुळे मुंबईमध्ये उतरवण्यात आले. १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर विमानात बिघाड झाल्याच्या अनेक प्रकरणं समोर आली आहे. आरटीआय रिपोर्ट्सनुसार, मागील पाच वर्षात भारतात विमानाचे इंजिन खराब झाल्याची ६५ प्रकरणं समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
इंडिगोच्या फ्लाईट क्रमांक 6E 6271 या विमानाने बुधवारी दिल्ली विमानतळाहून गोव्याकडे उड्डाण केले होते. पण उड्डाणानंतर काही वेळातच इंजिन बिघडल्याचे समोर आले. विमान १७ ते १८ मिनिटे हवेतच घिरट्या मारत होते. पायलटने तात्काळ मुंबई विमानतळावर विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. याबाबत पायलटने एटीएससी संपर्क केला अन् मुंबई विमानतळावरील आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली. विमानाचे सुरक्षित लँडिंग पार पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. इंडिगोने तात्काळ प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली.
विमानाचे इंजिन फेल –
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-गोवा विमानाचे एक इंजिन हवेत असताना बंद पडले. त्यानंतर पायलटने तात्काळ ATC ला माहिती दिली आणि मुंबईत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. रात्री 9:25 वाजता आपत्कालीन सायरन वाजवल्यानंतर, विमानतळावर पूर्ण आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आले. फायर टेंडर आणि रुग्णवाहिका स्टँडबायवर ठेवण्यात आल्या होत्या. विमान रात्री 9:42 वाजता मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
