महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव बोधचिन्हाचे लवकरच अनावरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुलै ।। राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर केला आहे, आता हा महोत्सव राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या एक बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे अशी माहिती सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज विधानसभेत दिली.

संपूर्ण राज्यभर सांस्पृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला व संस्कती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठय़ा प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही करण्यात येईल. तसेच मराठी भाषिक बहुल हिंदुस्थानाच्या बाहेरील काही देशामध्ये सांस्पृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी, माहितीही आशिष शेलार यांनी दिली. महोत्सवाच्या निमित्ताने तालुका स्तरावर उत्पृष्ट सार्वजनिक गणेशोत्व स्पर्धा, गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट व नाणे, ड्रोन शो, पारंपारिक भजन व आरती सादर करणाऱया भजनी मंडळांना साहित्य वाटप असे उपक्रमही राबवण्यात येणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *