1 ऑगस्टपासून यूपीआयचे नियम बदलणार…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। फोन पे, गुगल पे आणि पेटीएम यासारख्या यूपीआय अॅप्सचा वापर करणाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआयच्या नियमात बदल केले जाणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने ट्रान्झॅक्शन सिस्टमला आणखी सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम आणण्याचे ठरवले आहे.

सर्वात आधी 1 ऑगस्टपासून यूपीआयवर बॅलन्स चेक करण्यासाठी मर्यादा येणार आहे. एका अॅपवरून दिवसभरात केवळ 50 वेळा बॅलन्स चेक करता येईल. वारंवार बॅलेन्स चेक केल्याने सिस्टमवर लोड पडतो आणि सर्व्हर डाऊन होते, त्यामुळे हा बदल करण्यात येणार आहे. लिंक्ड बँक अकाउंट्स चेक करण्यावरही मर्यादा येणार आहे. एका दिवसात केवळ 25 वेळा मोबाईल नंबरवरून अकाउंट्स पाहू शकता येईल. नेटफ्लिक्स, एसआयपी यासारख्या सेवेच्या पेमेंट आता केवळ 3 स्लॉटमध्ये होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *