महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 22 जुलै ।। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट बघत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये ८ व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वित्त मंत्रालयाने आठव्या वेतन आयोगाबाबत माहिती दिली आहे.
वित्त मंत्रालयाने सांगितले की अधिसूचना जारी झाल्यानंतर समितीची स्थापना केली जाईल. अध्यक्ष आणि सदस्यांनी नियुक्ती केली जाईल. यानंतर पेन्शन आणि वेतनच्या संशोधनासाठी जे Terms of Reference (ToR) लागणार आहे ते निश्चित करण्यात आलेले नाही. या अटींच्या आधारे १ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात बदल होणार आहे.
लोकसभेत वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यात आला की, सरकार २०२६ मध्ये लागू होणार असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी केली की नाही? यावर सरकारने सांगितले की, आयोगाच्या स्थापनेसाठी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि वेगवेगळ्या राज्यांकडून इनपुट घेतले जात आहे. अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती अधिसूचनेनंतर केली जाईल.जेव्हा आयोग त्यांच्या शिफारस देईल आणि सरकार त्या स्वीकारतील त्यानंतरच आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार हे ठरवले जाणार आहे.
आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार?
आठव्या वेतन आयोगाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वित्तीय कंपन्या अॅम्बिट कॅपिटलच्या अहवालात म्हटले आहे की, पगारात किमान १४ आणि कमाल ५४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांसाठी १.८६ आणि २.४६ फिटमेंट फॅक्टरची शिफारस करु शकतात.