Trade Deal : अनेक वर्षाचं वैर मिटवत ‘इतिहासातील सर्वांत मोठा व्यापारी करार…’ डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री जपानसोबत एक करार केला आहे, जो काही दिवसांपूर्वीपर्यंत अशक्य वाटत होता. ट्रम्प या कराराला आतापर्यंतचा सर्वात मोठा करार म्हणत आहेत. त्याचा काय परिणाम होईल, कोणाला फायदा होईल… सर्वकाही जाणून घेऊ या.

अमेरिकेचा जपानसोबत आतापर्यंतचा सर्वात मोठा करार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानसोबत व्यापार कराराची घोषणा केली आहे, ज्याला त्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा करार म्हणून संबोधले आहे. या Trade Deal मुळे दोन्ही देशांमधील जुना व्यापार तणाव संपला आहे. जपान आता अमेरिकेत $550 अब्ज (सुमारे 55,000 कोटी) गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे लाखो नोकऱ्या निर्माण होतील आणि आर्थिक बदल घडून येतील अशी अपेक्षा आहे. पण या करारानंतर भारतावर काय परिणाम होईल?

ट्रम्पने अशक्य ते शक्य केले?
CNN मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री जपानशी दीर्घकाळ चाललेली चर्चा संपवली आणि अखेर एकत्र काम करण्यास सहमती दर्शवली आणि दोन्ही देशांनी व्यापार करार केला. काही दिवसांआधीपर्यंत दोन्ही देश Trade Deal वर पोहोचणे आणि एकत्र व्यवसाय करणे अशक्य वाटत होते, त्यामुळे येत्या काळात अमेरिका भारतासोबत असाच करार करू शकेल अशी आशा निर्माण झाली आहे. सध्या अमेरिका आणि भारत अनेक व्यापार समस्या सोडवण्यात व्यस्त असून आता या ऐतिहासिक कराराबद्दल जाणून घेऊया.

निवडणूक प्रचारात ओळख, मदतीच्या बहाण्याने विवाहितेला ओढले जाळ्यात; ठाकरेंच्या शिवसेना शहरप्रमुखाला अटक
जपानसोबत झालेल्या Trade Deal नुसार जपानमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 15% Reciprocal Tariffs आकारले जाईल आणि त्या बदल्यात जपान कार, ट्रक, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांसारख्या अमेरिकन वस्तूंसाठी आपली बाजारपेठ खुली करेल. या करारातून अमेरिकेला 90% नफा मिळेल आणि लाखो नोकऱ्या निर्माण होण्याचा ट्रम्प यांनी दावा केला. जपानची $500 अब्जची गुंतवणूक अमेरिकेसाठी गेम चेंजर ठरू शकते.

जपान-अमेरिकेतील जुने शत्रुत्व संपले
यापूर्वी अमेरिका आणि जपानमध्ये व्यापारावरून खूप तणाव होता. ट्रम्प यांनी जूनमध्ये म्हटले होते की, ‘जपानी लोक खूप सक्त आहेत.’ जपान त्यांच्या बाजारात अमेरिकन तांदूळ आणि कारना कमी जागा देतात ज्यामुळे ट्रम्प नाराज झाले. गेल्या वर्षी जपानने $298 दशलक्ष किमतीच्या फक्त 16,707 अमेरिकन कार आणि तांदूळ खरेदी केले देतात दीर्घ वाटाघाटी आणि जपानी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांच्या बैठकीनंतर, करार अंतिम झाला. ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंधांसाठी हा ‘रोमांचक काळ’ असल्याचे म्हटले.

आशियाई शेअर बाजार गुले गुलजार
आदल्या दिवशी अमेरिकेन शेअर मार्केटमध्ये सकारात्मक ट्रेडिंग पाहायला मिळाली तर बुधवारी आशियाई बाजारातही हिरवळ दिसत आहे. अमेरिका-जपान व्यापार कराराच्या घोषणेनंतर जपानच्या निक्केई225 निर्देशांकामध्ये मोठी वाढ झाली. भारतीय वेळेनुसार सकाळी 7:45 वाजता जपानचा निर्देशांक 1092.19 अंकांच्या वाढीसह 40,867.10 वर आला. त्याचवेळी, हाँगकाँग, चीन आणि कोरियन बाजारात सकारात्मक ट्रेडिंग होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *