महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. ९ पानांच्या या पीएम रिपोर्टमधून त्यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली होती ही माहिती समोर आली आहे. बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष मुंडे यांच्यापेक्षा भयंकरपद्धतीने महादेव मुंडे यांना संपवण्यात आले होते. आरोपींनी महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड- मान आणि हातावर तब्बर १६ वेळा वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांच्या कळ्यावर २० सेंमीपर्यंत लांब, ७ सेंमी रुंद आणि ३ सेंमी खोल असा वार होता. या शवविच्छेदन अहवालातून गुन्हेगाराची क्रूरता दिसून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी महादेव मुंडे यांची भरचौकात हत्या करण्यात आली होती. आरोपींनी महादेव मुंडे यांच्यावर इतक्या भयंकर पद्धतीने हल्ला केला होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हत्येनंतर महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर २२ ऑक्टोबर रोजी १२.१५ ते १.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल सव्वातास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी महादेव मुंडे यांच्या शरीरावर अनेक जखमी होत्या.
पोलिसांनी पंचनामा केला असता त्यावेळी महादेव मुंडे यांच्या अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेले पांढरी बनियन, ब्राऊन कलरचा शर्ट, लाल करदोरा आणि पाकीट होते. चेहरा छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. महादेव मुंडे यांच्या हत्येला २० महिने झाले. पण अद्याप त्यांच्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी पतीला न्याय मिळावा यासाठी वारंवर प्रयत्न करत आहेत. पतीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
महादेव मुंडे यांची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचा चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. आरोपींनी आधी महादेव मुंडे यांचा गळा कापला. गळ्यावर समोरून वार केलामुळे त्यांची श्वसननलिका कापली गेली. त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते. हल्ल्यामध्ये त्यांच्या रक्तवाहिन्या तुटल्या होत्या. त्यांच्या शरीरावर १६ वेळा वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांच्या हातावर अनेक जखमा होत्या. तसंच त्यांच्या पायालाही मार लागला होता. महादेव मुंडेंनी शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी त्यांनी जागेवरच संपवलं.
महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल –
– महादेव मुंडेचा गळा कापला
– मानेवर उजव्या बाजूला ४ वार
– तोंड ते कानापर्यंत १ खोल वार
– शरीरावर तब्बल १६ वार
– मारहाणीमुळे शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाला
– श्वसननलिका कापली, रक्तवाहिन्या तुटल्या
– मानेवर वार करताना घाव चुकला त्यामुळे तोंडावरून कानापर्यंत वार
– डाव्या आणि उजव्या हाताला अंगठ्याजवळ, तळहातावर, मधल्या बोटाजवळ वार
– डावा गुडघा खरचटलेला खाली पडल्यानंतर