HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. हाय सुक्युरिटी नंबर प्लेट सर्व वाहनांना असणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो. दरम्यान, आता एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही नंबर प्लेट लावू शकणार आहे.

२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवायची आहे. त्यानंतरच्या वाहनांना आधीच एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या एजन्सी काम करत आहेत. तुम्ही तुमच्या घराजवळील एजन्सीला भेट देऊन ही नंबरप्लेट बसवू शकतात. दरम्यान, यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते जाणून घ्या.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस (HSRP Registration Online Process)
सर्वप्रथम तुम्हाला transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

होमपेजवर गेल्यावर Apply High Security Registration Plate Online असा ऑप्शन दिसेल. त्यावर जाऊन ऑफस सर्च सिलेक्ट करा.

यानंतर APPLY HSRP वर क्लिक करा. यानंतर Order HSRP टाकायचा आहे. यानंतर वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर टाकायचा आहे. याचसोबत मोबाईल नंबर टाका.

यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचा ऑप्शन येईल. दुचाकी, ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये भरायचे आहे. तीनचाकी वाहनांसाठी ५००, चारचाकी आणि इतर वाहनांसाठी ७४५ रुपये भरायचे आहे.

ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला रिसिप्ट मिळेल. ती तूमच्याजवळ ठेवा.

यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या एजन्सीत जाऊन ही नंबर प्लेट बदलून घ्यायची आहे.त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *