महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। राज्यातील पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. काही ठिकाणी केवळ हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिवसभर तापमानात वाढ होण्याची शक्याता असून, दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास काही भागांमध्ये हलकासा पाऊस पडू शकतो, असे ही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान पुणे शहर व परिसरात काल रात्री पावसाची रिमझिम सुरु होती. काही भागंमध्ये पावसाची रिपरिप सुरु असल्याचे निदर्शनास आले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूनचं सामर्थ्य काहीसं कमी झालं असून, त्याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील काही दिवस कोरडसर हवामान राहण्याची शक्यता आहे.