महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। मध्यमवर्गीयाच्या स्वप्नातील घर आता अनेकांसाठी ईएमआय आणि मानसिक तणावामुळे एक दुस्वप्न ठरावं अशी परिस्थिती आहे. पुण्यातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांना ‘महारेरा’ने ‘स्थगिती’ दिलीय. विकासकांचा हलगर्जीपणा आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे खरेदीदारांना मालमत्ता हस्तांतरण किंवा परतावा मिळत नाहीय. त्यामुळे खरेदीदारांचे कोट्यवधी रुपये गृहप्रकल्पात अडकले. जिल्हानिहाय स्थगित प्रकल्पांची स्थिती काय आहे पाहूयात.
जिल्हानिहाय स्थगित प्रकल्पांची स्थिती
पुणे- 1244
ठाणे- 548
रायगड – 473
मुंबई उपनगर – 441
नाशिक- 250
नागपूर – 247
आर्थिक नियोजनाचा अभाव आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष यामुळे अनेक खरेदीदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ‘महारेरा’ने आता जरी कठोर पावले उचलली असली, तरी ग्राहकांना तत्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे. तसचं गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा स्वप्नातील घरं हे स्वप्नच राहील.