महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून हा टॅरिफ लागू होणार होता. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सात ऑगस्टपर्यंत २५ टक्के टॅरिफचा निर्णय थांबवण्यात आला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या २५ टक्के टॅरिफनंतर मोदी सरकारला विरोधकांनी घेरलं होतं. तर भारताकडून अमेरिकेला कडक शब्दात इशारा दिला होता. देशहितासाठी जे महत्त्वाच निर्णय घेतला जाईल, असे पियूष गोयल यांनी संसदेत सांगितले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बुधवारी संध्याकाळी भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा केली. त्यावर भारत सरकारच्या वतीने वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सांगितले की, कोणताही निर्णय हा देशाच्या हितासाठीच घेतला जाईल. तर दुसरीकडे टॅरिफच्या मुद्द्यावर भारताशी चर्चा सुरू असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. भारताच्या या निवेदनानंतर अमेरिकेने लागू केलेले टॅरिफ एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. ७ ऑगस्टपर्यंत भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू नसेल.
सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करारावरून चर्चा सुरू आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या चर्चेत अद्याप अंतिम सहमती झालेली नाही. डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वीही भारताने लावलेल्या टॅरिफवर नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, जगात भारत हा असा देश आहे जो सर्वाधिक टॅरिफ आकारतो.
यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय स्थगित
अमेरिकेचे दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली. यावेळी त्यांनी एकाच वेळी ९२ देशांवर नवे टॅरिफ लागू केले. त्यासाठी त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीही केली आहे. यापूर्वी २ एप्रिलला डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. परंतु त्यावेळी सात दिवसांनंतर त्यांनी हा निर्णय ९० दिवसांसाठी पुढे ढकलला होता. नंतर त्यांनी ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. आता ८ ऑगस्टपर्यंतची नवी मुदत दिली आहे.