महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। मुंबईहून पुणे आणि पुणे-मुंबई असा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. अवघ्या दीड तासांत मुंबईहून पुण्याला जाता येणार आहे. आणखी एक महामार्ग होऊ घातला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. नवा होऊ घातलेला महामार्ग हा थेट पुण्याच्या रिंगरोडला कनेक्ट होणार आहे. मुंबई मायानगरी ही पुण्याच्या आणखी जवळ येणार आहे. अवघ्या दीड तासांत मुंबईहून पुण्याला पोहोचता येणार आहे. मुंबई आणि पुणेकरांसाठी ही आनंदवार्ता आहे.
गडकरी यांनी सांगितला प्लान!
नितीन गडकरी यांनी प्रस्तावित असलेल्या नव्या महामार्गाबाबत माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या काळात अटल सेतू बांधण्यात आला. माझ्या काळात त्याची योजना झाली, पण मी बांधू शकलो नाही. आता उरण मतदारसंघातून जाणारा मुंबई-बेंगळुरू महामार्ग बांधला जाणार आहे. तो थेट पुण्याच्या रिंग रोडला जोडला जाणार आहे. दीड तासांत मुंबईवरून पुण्यात आणि पाच तासांत बेंगळुरूला पोहोचता येणार आहे, असं गडकरी म्हणाले.