Asia Cup: भारत पाकिस्तान सामना होणारच! ACC ने जाहीर केली तारीख ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। आशियाई क्रिकेट काउन्सिलने आशिया कप 2025 (Asia Cup 2025) बाबतचं परिपत्रक जाहीर केलं आहे. यानुसार आशिया कप 2025 ही स्पर्धा दुबई आणि अबुदाबी या दोन ठिकाणांवर खेळवली जाणार आहे. यंदाची स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असून 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आशिया कप 2025 चे सामने खेळवले जातील.

भारत पाकिस्तान सामना कधी?
आशियाई क्रिकेट काउन्सिलने जाहीर केल्यानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघ एकाच ग्रुपमध्ये राहणार आहेत. या दोघांमध्ये ग्रुप स्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान सह यूएई, ओमनचा समावेश असणार आहे. काही दिवसांपूर्वी पहलगाम हल्ल्याच्या पाश्वभूमीवर WCL स्पर्धेतून इंडिया लेजेंड्स संघानं माघार घेतली होती. त्यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर सेमी फायनल सामना सुद्धा पाकिस्तान विरुद्ध असल्याने इंडिया लेजेंड्स संघाने स्पर्धेतूनच माघार घेतली होती. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी होत असताना सुद्धा आशियाई क्रिकेट काउन्सिलने परिपत्रक जाहीर करून भारत पाकिस्तान सामना होणारचं यावर शिक्कामोर्तब केलाय.

आशिया कप 2025 मध्ये किती संघांचा सहभाग?
आशिया कप 2025 मध्ये यंदा एकूण 8 संघ सहभागी होणार असून यात भारत, अफगानिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, हॉन्ग-कॉन्ग, ओमान आणि यूएई इत्यादींचा सहभाग आहे. आशिया कप 2025 च्या स्पर्धेत सुरुवातीला ग्रुप स्टेज सामने खेळवले जाणार आहेत. रस्ताही 8 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए – भारत, पाकिस्तान, यूएई, ओमन तर ग्रुप बी – बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हॉंगकॉंग

आशिया कप 2025 मध्ये भारताचे सामने कधी?
ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा 10 सप्टेंबर रोजी यूएईमध्ये होईल. तर दुसरा सामना हा 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये होईल. भारताचा तिसरा ग्रुप स्टेज सामना हा 19 सप्टेंबर रोजी ओमानमध्ये होईल.

कुठे खेळवले जाणार आशिया कपचे सामने?
आशिया कप 2025 मध्ये यंदा एकूण 19 सामने खेळवण्यात येतील. यातील 11 सामने हे दुबईत आणि 8 सामने हे अबुदाबीत खेळवले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *