RBI Repo Rate: होम लोन, कार लोन स्वस्त होणार; RBI पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑगस्ट ।। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. आरबीआयची पतधोरण बैठक सुरु आहे. ही बैठक ६ ऑगस्ट म्हणजे उद्या संपणार आहे. उद्या पतधोरण बैठकीनंतर महत्त्वाची घोषणा होऊ शकते. यामध्ये रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे.

रेपो रेट कमी होणार? (Repo Rate Will Decrease)
या पतधोरण बैठकीत रेपो रेट आणखी कमी होण्याची शक्यता आहे. रेपो रेट ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान याचवर्षी तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. एकूण १ टक्के रेपो रेटमध्ये कपात झाली आहे.

सध्या रेपो रेट ५.५० टक्के आहे. त्यात आणखी कपात झाली तर सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.रेपो रेटमध्ये कपात झाली की त्याचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होणार आहे. होम लोन, कार लोनमध्ये कपात होणार आहे. यामुळे ग्राहकांना आर्थिक फायदा होईल.

होम लोन होणार स्वस्त (Home Loan Get Cheaper)
रेपो रेट कमी झाल्यावर त्याचा थेट परिणाम होम लोनवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या रेपो रेटवर बँकांचे व्याजदर ठरते. जर रेपो रेटमध्येच कपात झाली तर होम लोनवरील व्याजदरदेखील कपात होणार आहे.

एका अहवालानुसार, व्याजदरात कपात झाली तर लवकरच दिवाळी येऊ शकते. आता सणासुदीचेही दिवस सुरु होणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात पत वाढीला चालना मिळते. याकाळात जर रेपो रेट कमी झाला तर अजून फायदा होईल. ऑगस्ट २०१७ मध्ये रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केल्यावर दिवाळीच्या अखेरीस क्रेडिट ग्रोथ १,९५६ अब्ज रुपयांनी वाढला होता. दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. या काळात ग्राहकांचा खर्च वाढतो. दिवाळीपूर्वी जर व्याजदरात कपात झाल्यामुळे कर्ज घेण्याचा दरही सुधारतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *