महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑगस्ट ।। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा ठरु शकते. मिडिया रिपोर्टनुसार, १५ ऑगस्ट रोजी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा जो महागाई भत्ता वाढणार आहे तो १ जुलैपासून लागू होणारा आहे. त्यामुळे तुम्हाला येत्या पगारात तुम्हाला महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता कधी वाढतो? (When Will Dearness Allowance Hike)
वर्षभरात दोन वेळा महागाई भत्ता वाढतो.जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होते. यामुळे देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ होणार आहे. प्रत्येक सहा महिन्यांना हा महागाई भत्ता वाढतो.
महागाई भत्ता हा महागाईच्या आकड्यांवर (CPI) वर निर्धारित असतो. जुलै २०२५ चा आढावा घेण्यात आला आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. १५ ऑगस्टपूर्वी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implemented)
केंद्र सरकारी कर्मचारी आता ८व्या वेतन आयोगाची वाढ पाहत आहेत. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.४६ असू शकतो. त्यामुळे जर कोणाचा मूळ पगार १८००० रुपये असेल तर २.४६ फिटमेंट फॅक्टरनुसार त्याचा पगार ४४,२८० होईल.