HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेटसाठी शेवटचे ८ दिवस : नंतर लागणार ₹१०,००० चा दंड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ ऑगस्ट ।। वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, २०१९ पूर्वीच्या वाहनांना आधीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. १ एप्रिल २०२५ आधीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवण्याची मुदतवाढ आतापर्यंत दोन ते तीन वेळा केली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ही नंबरप्लेट बसवली नसेल तर लवकरच बसवा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

राज्यात जवळपास २.१ कोटी वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. त्यातील फक्त २३ लाख महिलांनीच ही नंबरप्लेट बसवली आहे. त्यामुळे आता ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांना दंड भरावा लागणार आहे.

किती दंड भरावा लागणार?
जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. तुम्हाला मोटर कायदा १७७ अंतर्गत १,००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. ही कारवाई भरारी पथकांमार्फत केली जाईल. दरम्यान, जर तुम्ही १५ ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली असेल आणि फिटमेंटची तारीख नंतरची असेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *