महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ ऑगस्ट ।। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत. त्यामुळे महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली, असं म्हणायला हरकत नाही.
लाडकीच्या खात्यात जुलैचे १५०० जमा
लाडकी बहीण योजनेत रक्षाबंधनच्या दिवशी जुलैचा हप्ता येईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर लाडकीच्या जुलैच्या हप्ताची प्रोसेस सुरु झाली आहे, रक्षाबंधनच्या पुर्वसंध्येला पैसे जमा केले जातील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे जमादेखील झाले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये आले आहेत.
लाडकी बहीण योजनेत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त बँकेच्या अॅपवर जायचे आहे. त्यानंतर बॅलेन्स किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणी पैसे पाठवले हे समजेल. यावरुन तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही याची माहिती मिळेल.
याचसोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात. तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करु शकतात. याचसोबत तुम्ही बॅलेन्स चेक करु शकतात. त्यावरुन तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही समजेल.